Headlines
Loading...


माझ्या मना , माझ्या मना,
नको विसरू त्या भेटी त्या खाणा खुणा..--२

कधी वेचली मी फुले चांदण्यांची --
कधी झेलली मी सावली उन्हाची--२

कधी पावसात इथे धुंद न्हालो ,
कळले कधी ना कधी एक झालो..
मी जपल्या अजुनी त्या पाऊलखुणा..
माझ्या मना , माझ्या मना,
नको विसरू त्या भेटी त्या खाणा खुणा..
माझ्या मना , माझ्या मना,

निळे सावळे मेघ दाटून आले ,
सुन्या मैफिलीने नवे रंग ल्याले --२

मी मिटताच डोळे तुला पाहते रे..
तुझा श्वास श्वासातून वाहतो  रे..
माझ्या मना , माझ्या मना,
नको विसरू त्या भेटी त्या खाणा खुणा..
माझ्या मना , माझ्या मना,

0 Comments: