Headlines
Loading...

ओली ती माती ओला तो गंध 
ओली ती सांज तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू
माझ्या श्वासात एक तू 
पानात तू दवात तू 
रोम रोमातच तू
सरीत तू लहर तीच तू
ओली ती माती ओला तो गंध 
ओली ती सांज तुझा सुगंध ....

माझी न मी राहे पाहूनी तुला रे
आतुरले किती मी, मिठीत घे मला रे
मेघ कसे दाटले बरसुनी तू येना रे (twice) 
ओली ती माती ओला तो गंध 
ओली ती सांज तुझा सुगंध.....ढगांचा स्पर्श मृदुलतो
रविला ही लपवतो
मंद वारा वाहतो 
चांद खुशीत हासतो
ओठात मी गुणगुणू
कानात तू रूणुझुणू
ऊन ही तू सावली तू
इंद्रधनू तू
पहाटेचा समीर तोच तू

ओली ती माती ओला तो गंध 
ओली ती सांज तुझा सुगंध....

Movie Cast & Credits:
Cast : Parna Pethe, Chetan Chitnis, Vandana Gupte, Anshuman Joshi
Director : Vijay Maurya
Producer : Akash Rajpal and Neha Rajpal
Studio: Viacom 18 Motion Pictures
Story : Omkar Mangesh Datt, Akash Rajpal
Screenplay : Vijay Maurya, Yogesh Joshi
Editor : Ninad Khanolkar
Cinematographer/DOP : Manoj Khatoi
Production Design/ART : Mahesh Salgaonkar
Executive Producer : Ranjit Gugle

0 Comments: