Headlines
Loading...
तो बसतो, तो फसतो तरी गालातच हसतो ,
दीड पाच सात अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो,

(कोरस )
तो बसतो, तो फसतो तरी गालातच हसतो ,
दीड पाच सात अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो,

थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो,
आपल्या सारखा असता तर काय म्हणाला असता?
नैवैद्य दाखवल्यावर,
आजकाल २१ मोदकाने काय होता साहेब?
अस म्हणाला असता?

नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला,
तुमि नवसाच्या line मध्ये नव्हता ना मॅडम..
असं म्हणाला असता?

अंधेरी वरून आलेल्या भक्ताला लालबाग चा बाप्पा ...
हे अंधेरी च मॅटर हे, अंधेरी च्या बाप्पाला कॉन्टॅक्ट करा..
असं म्हणाला असता?

नाही.. त्याचा आशीर्वाद सगळ्यांवर सारखाच बरसतो.
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो,

त्याच्या नावाखाली आम्ही धंदा थाटलाय,
एक असला तरी त्याला मंडळांमध्ये वाटलाय..

गणपती च्या सणाला परवा एक जण म्हणाला..
त्या फेमस गणपतीचा तेवढा दर्शन करून दे..
भक्ताच्या या डिमांड ला तो गालातच हसतो..
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो,

आशीर्वादच त्याने पॅकेज दिल असतं?
माझ्याबरोबर शंकराचे आशीर्वाद.. फक्त २०हजार.
ग्रुप नवस केला तर डिस्काउंट दिल असतं?विसर्जनाच्या २ दिवस आधी..
Last two days Last two days..
असं ओरडला असता..
(कोरस)
Last two days Last two days..
नाही नाही ..

भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो,

त्याची उंची फुटात मोजणारे आपण,
भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण..
जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा..
नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा..
एक कशाला हो..
दीड पाच सात अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो,
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो...

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काय नजारा असतो?
दीड कोटी डोके ज्या पायावर टेकले तो पाय कुठेतरी असतो..
तेवढेच आशीर्वाद देणारा हात कुठेतरी असतो..
एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा स्वतः मात्र चोवपाटीवर विखुरलेला असतो..

तरीही... तो हसतो तो फ़सतो, पुढच्या वर्षी आंनदाने आपल्या घरी बसतो..
त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो...
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो..
थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो..

बसतो हसतो फसतो तरी गालातच हसतो..
तुमच्या आंनदातच त्याला इंटरेस्ट असतो..
दीड पाच अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो..

1 comment