Headlines
Loading...
Bagha Ughaduni Daar Antarangatal Dev Ghaval Ka by
Lyrics by Guru Thakur,
Music By Ajay Atul,
Singer : Roopkumar Rathore

शोधून शिणला जीव आता रे
साद तुला ही पोचंल का
दारोदारी हुडकंल भारी
थांग तुझा कधी लागंल का
शाममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटंल का
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुणी तरी दावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?

तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राउळी
बाप झाला कधी जाहला माऊली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?

राहतो माउलीच्या जीव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी
तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी
राहतो तो मनी , या जनी जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?

3 comments