Tujhya Gulabi Othanvarti | A Marathi Ghazal By Rafique Shaikh

2:06:00 AM Rahul Gawale 0 Comments
तुझ्या गुलाबी ओठांवरती , गीत लिहावे ओठांनी
चंद्र असावा मिठीत अन, धुंदीत राहावे ओठांनी.

नाजूक कोमल मऊ पाकळ्या, तारुण्याने मुसमुसल्या,
फुल सुंगधी ओठांचे ते, खुडून घ्यावे ओठांनी.

हळूच हसता लक्ख चांदणे, अंगावरती बरसावे,
गालावरच्या खळीत तेव्हा, सहद  टिपावे ओठांनी.

किती युगांचे तहानलेले ओठ कोरडे झालेले,
खुशाल आता ओठांमधले अमृत ओठांनी.

स्पर्श सांगती स्पर्शाना अन डोळे वदती डोळ्यांना,
अशा घडीला मूक राहुनी, फक्त पाहावे ओठांनी.

गजलकार : डॉ श्रीकृष्ण राऊत
GAZALKAR-DR. SHRIKRISHNA RAUT

0 comments :