Headlines
Loading...
चुकतंय चूक चुकतंय
सगळं सगळं चुकतंय

डोंगर करतंय शीर्षासण
दर्या पितय पाणी
आभाळ लोळतंय जमिनीवर
फांद्यावर फुलदाणी

वाऱ्यालाही फुटलाय घाम
पप्पा लावतोय डोक्याला बाम
पृथ्वी म्हणतेय दुखतंय पाय
कोण जाणे काय चाललंय काय

चुकतंय...चुकतंय
मासे पहुडलेत किनारी शांत
पाखरांना नाही उडायची भ्रांत
कंटाळ आलाय चराचरायला
ब्रह्मांड पडलय निश्चित निवांत

रात्रीच वागणं चुकतंय
दिवसाचं जागण चुकतंय
येकाच मागणं चुकतंय
दुसऱ्याचं सगळं चुकतंय

हेही चुकतंय... तेही चुकतंय
सगळंच चुकतंय

छप्पर म्हणतंय खिडकीत ये
थंडीच म्हणतेय घोंगडं दे
सूर्याला पाहिजेत किरणं चार
चंद्राला नाभाचाच भर

पूर्वेच्या प्रेमात पश्चिम
उत्तर देईना दक्षिण
देवच म्हणतोय नाही
हे चाललंय काय

सगळंच चुकतंय इकडे

चुकतंय चूक चुकतंय
सगळं सगळं चुकतंय

0 Comments: