Saavar Re Lyrics (Classmates) / सावर रे

2:02:00 PM Rahul Gawale 0 Comments


Saavar Re (Classmates) / सावर रे

रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे 
आज इथे तू न जरी तरी भवती भास तुझे 
तुझ्या आठवांचा शहारा
जरा येऊनी ह्या मनाला 
सावर रे, सावर रे 

रोज मला विसरून मी गुणगुणते नाव तुझे 
आज इथे तू न जरी तरी भवती भास तुझे 

खुणावती रे अजून ह्या सभोवताली रे तुझ्या खुणा 
अजून ओल्या क्षणात त्या भिजून जाती पुन्हा पुन्हा 
ओल पापण्यांना ओढ पावलांना लागे तुझी आस का 
का अजून माझ्या बावऱ्या जीवाला लागे तुझा ध्यास हा
मन नादावते का पुन्हा 
सावर रे, सावर रे

0 comments :