Headlines
Loading...
किती सांगायचंय | Kiti Sangayachay Lyrics - Double Seat - Marathi Lyrics

किती सांगायचंय | Kiti Sangayachay Lyrics - Double Seat - Marathi Lyrics

किती सांगायचंय
किती सांगायचंय मला किती सांगायचं -२
हं हं ....

कोरड्या जगात माझ्या, भोवती चार भिंती,
बोचरे नकार सारे, आशा क्षणात विरती,
बैचैन स्वप्नांची अन पाखरे हरवून जाती,
मनाच्या पाऱ्याला आवरू किती ?
किती सांगायचंय मला किती सांगायचंय
किती सांगायचंय, मला तुला किती सांगायचंय !!

हं ....
मला..... हवे असे अलवारसे ,
कुणा कसे सांगायचे हे.. गाणे ?
मना माझ्या जगी जा रंगुनी,
पाहून घे तू हि हे स्वप्नं दिवाने !!

हलके हलके, सुख हे बरसे -२
मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे पहारे,
मनाच्या आभाळी अशी ओली ती लहरे,
मनाच्या या गावी असावे दोघांचे च गाणे ,
घेउदे मनाला श्वास मोकळा...

किती सांगायचंय  मला किती सांगायचंय,
किती सांगायचंय, मला तुला किती सांगायचंय !! -२

हसऱ्या सुखाचा पहिला वाहिला मोहर हा,
थकल्या जीवाला पहिल्या सरीचा दरवळ हा..
क्षण हे हळवे जपावे, जपावे, इवल्या ओठी हसावे..
आज चिंब व्हावे, पार पैल जावे,

किती सांगायचंय  मला किती सांगायचंय,
किती सांगायचंय, मला तुला किती सांगायचंय !! -२
मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे पहारे,
मनाच्या आभाळी अशी ओली ती लहरे,
मनाच्या या गावी असावे दोघांचे च गाणे ,
घेउदे मनाला श्वास मोकळा...

0 Comments: