कोळशाच्या कोंबडीला अंडं हे सोन्याचं,
लब्बाड डोळ्यात घब्बाड स्वप्नांचं।
इवल्याश्या खांद्यावर ओझं हे त्रासाचं,
पण आपलं ठरलंय ना पुठ्ठयाच घासाच।
ए..ए यड्या, हसूया गावूया खाऊया..
ए..ए यड्या, वेचुया, मोजूया, नाचुया..
हेच आता लॉटरी हेच रेशन वर,
हाच आता खेळ अन अभ्यास,
हा अहा अहा अहा ...
हीच आता नौकरी, हाच बिझनेस पण,
हीच कमाई बघ झक्कास..
हा अहा अहा अहा ...
ए..ए यड्या, हसूया गावूया खाऊया..
ए..ए यड्या, वेचुया, मोजूया, नाचुया..
कोळसा कडेवर कोळसा हातात,
कोळसा मनातं अन डोळ्यात,
हा अहा अहा अहा ...
कोळशाचा दिवस, कोळशाची रात,
कोळशाचं रान आता ताब्यात,
हा अहा अहा अहा ...
ए..ए यड्या, वेचुया, हासुया, नाचुया..
ए..ए यड्या मोजूया, गावूया, खाऊया..
Comments
Post a Comment