Kaaljachya Payathyala | Bhavananchi Vaadale | Bhimrao Panchale

काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे,
जीव घेण्या वेदनेला प्रेम ऐसे नाव आहे.

पार या भवसागराच्या जायचे आहे मला,
वादळी लाटात माझी कागदाची नाव आहे.

रोज कुरवाळीत बसतो मी जुन्या जखमेस माझ्या,
वंचनेचा हा जिव्हारी लागलेला घाव आहे.

शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखास माझ्या,
पापण्यांशी आसवांना यायचा मज्जाव आहे.



Comments

Post a Comment