Toofan Aala Song Lyrics | Satyame Jayate

1:30:00 AM Rahul Gawale 1 Comments


एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया(x2)

भेगाळ माय मातीच्या या डोळ्यात आली आसं,
घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास।
हे... लय दिसांनी भारल्यावानी शिवार झालयां...

एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया...

हो पिचलेला, इझलेला टाहो कधी न कुणा कळला,
तळमळलिस तू, करपुनी हिरवा पदर तुझा जळला,

छळ केला पिढीजात तुझा गं उखडून वनराई,
अपराध किती झाले आता पण शरण तुला आई,

नभपाझरता ते जलधन सारे, जीरवू तुझ्या ठायी,
बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुज आई,
हो... उपरतीन आलीय जाण जागर झालंया...

एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया...

हो... जरी रूजलो उदरात तुझ्या, कुशीत तुझ्या घडलो,
स्वार्थाचे तट बांधत सुटलो अन वैरी तुझे ठरलो,
चालवुनी वैराचे नांगर नासवली माती,
छिन्न तुझ्या देहाची चाळण उरली अता हाती...

आम्ही हाल उन्हाचे मिटवून सारे, आज तुझ्या पायीं,
बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुज आई,

एकजुटीन पेटलं रान तुफान आलया,
काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया(x2)

1 comment :