Dev Pahila Lyrics | Ringan

गायक : अजय गोगावले,
गीतकार : वैभव देशमुख,
संगीतकार: रोहित नागभिडे।

----- देव पहिला -----

हे आला डोळ्यात उजेड, झाली मनात पहाटं,
आज घावली घावली पावलांना नवी वाटं।

हे उधळलं काळजात रंग आनंदाचं दाट,
उधळलं काळजात रंग आनंदाचं दाट,
आज हसऱ्या गंधानं वारा वाहतो भन्नाट।

मन आतुर आतुर घेण्या, सपणांची गाठं,
ओढ लागलिया पाय चालल जोमात...

आ आ ...

हे आला डोळ्यात उजेड, झाली मनात पहाटं,
आज घावली घावली पावलांना नवी वाटं।

सुख दूर पाळणार  कसं आलंया जवळ,
कसा इवल्या मुठीत आज मावलं आभाळ।

फाकू लागला अंधार आलं दिव उमलून,
कसा मनात आनंद वही दुथडी भरून ।

तुझ्या डोळ्यामंदी चंद्र मन भरुन हसला ,
तुझ्या डोळ्यामंदी चंद्र मन भरुन हसला ,
आज माझ्यामंदी माझा मी इठ्ठल पाहिला,
मी इठ्ठल पहिला मी इठ्ठल पहिला ।




Comments