Deva Anthem Lyrics in Marathi

जनाजनातून मनामनातून आला
हे.... घराघरातून तुझ्यामाझ्यातून आला
अतरंगी होहो.. हळुवार होहो..
दिलदार होहो.. अवतार नाही हा माणूस साधा
देवा.... देवा....

क्षणक्षणातून आनंद वाटत जातो,
कणाकणातून वेदना वेचून घेतो,
सारे तेच ह्या देवापाशी भेद,
नाही उपास नाही नवस ही वेगळे,

संचार होहो.. कैवार होहो..
उद्धार होहो.. अवतार नाही हा माणूस साधा
देवा.... देवा....

धगधग डोळ्यात अंगार याच्या,
धगधग श्वासात याच्या,
कणकण मायेचा पाझर याच्या,
कणकण हृदयात याच्या,

हा होतो दवा साऱ्या दुखाची,
हा घेतो दुआ भेटेल जो त्याची
हुंकार होहो.. ,झंकार होहो..
ललकार होहो.. अवतार नाही हा माणूस साधा
जणू देवासारखा
देवा.... देवा....

Comments