अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहील तेही आनंदाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
सोनेरी किरणे डोळ्यांत लेवून कोवळेसे ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदण्या कानांत माळून भरले आभाळ होऊन
कधी कधी बरसून ये, कधी कधी हमसून ये
कधी कधी दाटून ये ना जरा
कधी कधी सांगून ये , कधी कधी ना सांगता
कधी कधी फसवून ये ना जगाला साऱ्या
क्षण साद ही देतील रे मुक्याने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
श्वासात भरून आण कधी फुले होऊन ये तूच कधी तिन्ही ऋतू
बोटांनी दूर कर बटा या लाजेच्या गालावरी रान दंवाचे
कधी कधी वेचून ये , कधी कधी न्हाऊन ये
कधी कधी बिलगून ये ना जरा
कधी कधी हरवून ये , कधी कधी शोधून ये
कधी कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या
मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
वाट पाहील तेही आनंदाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
सोनेरी किरणे डोळ्यांत लेवून कोवळेसे ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदण्या कानांत माळून भरले आभाळ होऊन
कधी कधी बरसून ये, कधी कधी हमसून ये
कधी कधी दाटून ये ना जरा
कधी कधी सांगून ये , कधी कधी ना सांगता
कधी कधी फसवून ये ना जगाला साऱ्या
क्षण साद ही देतील रे मुक्याने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
श्वासात भरून आण कधी फुले होऊन ये तूच कधी तिन्ही ऋतू
बोटांनी दूर कर बटा या लाजेच्या गालावरी रान दंवाचे
कधी कधी वेचून ये , कधी कधी न्हाऊन ये
कधी कधी बिलगून ये ना जरा
कधी कधी हरवून ये , कधी कधी शोधून ये
कधी कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या
मग प्रीत ही बहरेल रे विरहाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
Nice
ReplyDelete