ती स्वप्नातल्या परिसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातूनी सजावि तशी
मी असा वेडासा, कधी थोडासा, स्वतःशी हसतो
नशा प्रेमाची, तिच्या स्पर्शाची, मनाशी जपतो
कधी कुठे मिळाव्या वळणावर वाटा… हया दोन्ही
ती चढ़ती नशा बेधुंदशा श्वासातली
ती कैफातल्या बेफ़िक्रशा भासातली
सहजच यावे ओठांवरती गीत जसे भेटते ती
गुणगुणताना भिरभिरते बणून पाखरू मना सभोवती
हसताना ती भुलतोच मी, लपताना ती झुरतो मी,
मन माझे वेडे हे सावरु कसे
ती स्वप्नातल्या परिसारखी कहाणी जशी
ती चित्रातल्या रंगातूनी सजावि तशी।
गायक : जसराज जोशी
संगीत : ह्रिषिकेश सौरभ जसराज
गीत : मंदार चोळकर
चित्रीपट : फुंत्रू
Comments
Post a Comment