संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
भोळी भाबडी माणसं भोळी भाबडी माणसं
लयी पुण्यवान माती
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
अंबेजोगाईची अंबा मुकुंद राजाला पावली
मुकुंद राजाला पावली
आद्य कवीने लिहिली इथे कविता पहिली
इथे कविता पहिली
असे नांदले भोसले
असे नांदले भोसले
सांगे वेरूळची गढी
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
कैक उलटली वर्ष नाही उमजले रंग
नाही उमजले रंग
करती दुनियेला दंग ऐसे अजिंठ्याचे रंग
ऐसे अजिंठ्याचे रंग
दूर दुनियेत साऱ्या
दूर दुनियेत साऱ्या
माझ्या कैलासाची ख्याती
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
भोळी भाबडी माणसं भोळी भाबडी माणसं
लयी पुण्यवान माती
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
संत महंतांची भूमी माझ्या मराठवाड्याची
- भगवानराव देशमुख
Comments
Post a Comment